अ‍ॅपशहर

ढेकुण आणि झुरळांमुळं थांबली एक्स्प्रेस

ढेकुण आणि झुरळांच्या त्रासाला वैतागून एसी डब्यातील प्रवाशानं चेन ओढून एक्स्प्रेस थांबवली. नवी दिल्लीहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. रेल्वे अधिकाऱ्यांनी संतापलेल्या प्रवाशांची समजूत काढल्यानंतर एक्स्प्रेस रवाना झाली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2019, 10:28 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम express

ढेकुण आणि झुरळांच्या त्रासाला वैतागून एसी डब्यातील प्रवाशानं चेन ओढून एक्स्प्रेस थांबवली. नवी दिल्लीहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. रेल्वे अधिकाऱ्यांनी संतापलेल्या प्रवाशांची समजूत काढल्यानंतर एक्स्प्रेस रवाना झाली.

पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. नवी दिल्लीहून रात्री ११.४५ वाजता एक्स्प्रेस गुवाहाटीसाठी रवाना झाली. काही वेळानं बी-४ या एसी
डब्यातील काही प्रवाशांनी चादरींमध्ये ढेकुण आणि डब्यात झुरळ असल्याची तक्रार एक्स्प्रेसमध्ये उपस्थित निरीक्षकांकडे केली. मात्र, त्याची दखल घेतली नाही. अखेर वैतागलेल्या प्रवाशांनी मध्यरात्री १२.३४ वाजता चेन ओढून एक्स्प्रेस थांबवली. तोपर्यंत एक्स्प्रेसनं गाझियाबाद स्थानक सोडलं होतं. याबाबतची माहिती मिळताच रेल्वे
स्थानकातील अधिकारी, पोलीस आणि टीसी एक्स्प्रेस थांबलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी बराच वेळ प्रवाशांची समजूत काढली. अखेर १२.५० वाजता एक्स्प्रेस
गुवाहाटीकडे रवाना झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज