अ‍ॅपशहर

चिमुकलीला आईने कचराकुंडीत फेकलं, उंदीर लचके तोडत असतानाच मिळालं जीवनदान...

Emotional Story: महिलेने मुलीला आपल्या हातात घेतलं, तिला दूध पाजलं, मग तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेली. जन्मानंतर मुलीला भुसौला दानापूर तलावाजवळ फेकून देण्यात आले होते.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2022, 12:59 pm
पाटणा: बिहारमध्ये नातेसंबंध आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. हे प्रकरण पाटणाला लागून असलेल्या दानापूरच्या फुलवारीशरीफ भागातील आहे. येथे एका नवजात चिमुकलीला तिच्या आईने अत्यंत निर्दयीपणे जन्मताच मरण्यासाठी सोडून दिले होते. यादरम्यान, त्या निष्पाप चिमुकल्या जीवावार उंदराची नजर पडली आणि तो तिला आपला शिकार बनवणार होता. मात्र, ते म्हणातात ना देव तारी त्याला कोण मारी, या बाळाचे रडणं तिच्यासाठी जीवनदायी ठरले आणि एका महिलेने तिला कुशीत घेऊन नवजीवन दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new born baby
निर्दयी आईने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, उर्मिलाने चिमुकलीला पदरात घेतलं, मन सुन्न करणारी कहाणी


महिलेने मुलीला आपल्या हातात घेतलं, तिला दूध पाजलं, मग तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेली. जन्मानंतर मुलीला भुसौला दानापूर तलावाजवळ फेकून देण्यात आले होते. मात्र, तिच्या रडण्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचल्याने गोणीत गुंडाळलेल्या या निष्पाप बाळासाठी लोक देवदूत बनले. उर्मिला देवीने तिच्या आईची माया दिली.

हेही वाचा -लाख रुपयांची रक्कम निमित्त ठरली; पण त्याचा अंत अनैतिक संबंधातून, सोलापुरात खळबळ

या बाळाला तिने घरी आणले. बाळाच्या हाताच्या तीन बोटांना आणि पोटाजवळ उंदराने चावा घेतला होता. लोकांनी पाहिले तेव्हा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा जीव वाचवण्यासाठी उर्मिला देवी तिला घरी घेऊन आली. तिला स्वच्छ केले, दूध पाजले आणि तिला डॉक्टरांकडे नेले.

उर्मिला सांगते की, आम्हाला मूलबाळ नाही. आम्हाला ती मिळाली आहे, म्हणून आम्ही तिचे पालनपोषण करु. या बाळाचं सध्या नामकरण करण्यात आलेलं नाही. उर्मिलाला मूलबाळ नाही, त्यामुळे तिला मूल मिळाल्याने गावकरीही आनंदात आहेत.

हेही वाचा -फोन आला, झुडुपात बेवारस सुटकेस आहे, उघडून पाहताच पोलिसांनाही घाम फुटला
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज