नवी दिल्ली :
वाडीलाल आणि क्रीमबेलसारख्या मोठ्या कंपन्या यंदाच्या उन्हाळ्यात आइस्क्रीमचे भाव वाढवण्याची शक्यता आहे. सुका मेवा आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे आइस्क्रीमचे दर ५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत या कंपन्यांनी दिले आहेत. मात्र किंमत वाढवूनही आइस्क्रीम उद्योगाला वार्षिक १५ ते १८ टक्के वाढीची अपेक्षा आहे. या उद्योगाचा डोलारा ८ हजार कोटी रुपयांचा आहे.
क्रीमबेलचे सीईओ नितीन अरोरा म्हणाले, 'मागील ६ महिन्यांपासून डिझेलचे दर २३ टक्के, मजुरी १० टक्के, पॅकेजिंग मटेरिअलच्या किंमती ८ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आइस्क्रीमचे दर वाढणार आहेत.' 'अमूल' ने अद्याप दुधाचे दर वाढवलेले नाहीत. क्वालिटी वॉल्सने आइस्क्रीमच्या दरासंदर्भात प्रतिक्रिया दिली नाही.
गेल्या काही वर्षांत आइस्क्रीमचे दर जैसे थे होते. उदाहरणार्थ, ऑरेंज बारसाठी ५ रुपये, कपसाठी १० रुपये, कोनसाठी २० रुपये इत्यादी. किंमती वाढल्या तरी आइस्क्रीम उद्योग तोट्यात जाणार नाही. उलट त्यात वाढच अपेक्षित आहे. ५ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या लहान शहरात, गावांतही आइस्क्रीमची मागणी वाढत आहे.