अ‍ॅपशहर

नितीन कोळी यांना श्रीनगरमध्ये आदरांजली

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात वीरमरण आलेले सीमा सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल नितीन सुभाष कोळी (वय ३२) यांच्या पार्थिवाला रविवारी श्रीनगरमध्ये बीएसएफतर्फे मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव आज, (सोमवारी) सांगलीत आणण्यात येणार आहे.

Maharashtra Times 31 Oct 2016, 1:09 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pays tribute to martyr bsf trooper nitin koli in srinagar
नितीन कोळी यांना श्रीनगरमध्ये आदरांजली

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात वीरमरण आलेले सीमा सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल नितीन सुभाष कोळी (वय ३२) यांच्या पार्थिवाला रविवारी श्रीनगरमध्ये बीएसएफतर्फे मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव आज, (सोमवारी) सांगलीत आणण्यात येणार आहे.

पाकिस्तानी सैन्याशी लढताना शस्त्राचा स्फोट होऊन नितीन यांचा शनिवारी मृत्यू झाला होता. येथील बीएसएफच्या कार्यालयातील हुमहमा सेंटरमध्ये कोळी यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. नितीन यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कोळी सांगली जिल्ह्यातील दूधगावचे रहिवासी आहेत.

पार्थिव आज सांगलीत

सांगलीः नितीन कोळी यांचे पार्थिव आज, सोमवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी दुधगाव येथे येणार आहे. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वारणा नदीच्या काठावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज