अ‍ॅपशहर

पेट्रोल होईल ३४ रुपये लीटर

वितरकांचे कमिशन आणि सर्व कर वगळले तर, राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ३४.०४ रुपये प्रती लिटर आणि डिझेलची किंमत ३८.६७ रुपये प्रती लिटर होऊ शकते,' अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिली आहे.

PTI 22 Dec 2018, 4:40 am
नवी दिल्ली : 'वितरकांचे कमिशन आणि सर्व कर वगळले तर, राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ३४.०४ रुपये प्रती लिटर आणि डिझेलची किंमत ३८.६७ रुपये प्रती लिटर होऊ शकते,' अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम petrol costs rs 34 per litre before tax dealer commission in delhi
पेट्रोल होईल ३४ रुपये लीटर


इंधनांच्या दरांबाबत १९ डिसेंबरला विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'पेट्रोलच्या दरात कर आणि वितरकांचे कमिशन याचा हिस्सा एकूण दराच्या ९६.९ टक्के असतो. तर, डिझेलमध्ये तो ६०.३ टक्के असतो. त्यामुळे मूळ दरात वाढ होते.' १९ डिसेंबर रोजी पेट्रोलचा किरकोळ दर ७०.६३ रु. होता. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क १७.९८ रु., राज्याचा 'व्हॅट' १५.०२ रु. आणि वितरकांचे कमिशन ३.५९ रु. होते,' असेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज