अ‍ॅपशहर

पी. विजयन केरळचे नवे सीएम

काँग्रेसची सत्ता उलथवून केरळमध्ये पुन्हा एकदा लाल बावटा फडकावणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून जुंपली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून पी. विजयन यांचं नाव निश्चित झाल्यानं माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन नाराज झाले आहेत. पक्षाच्या निर्णयावर संतापलेले अच्युतानंदन भर बैठकीतून उठून निघून गेल्याचं वृत्त आहे.

Maharashtra Times 20 May 2016, 3:31 pm
मटा ऑनलाइन वृत्त । थिरुवअनंतपुरम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pinarayi vijayan to be next chief minister of kerala
पी. विजयन केरळचे नवे सीएम

काँग्रेसची सत्ता उलथवून केरळमध्ये पुन्हा एकदा लाल बावटा फडकावणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून जुंपली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून पी. विजयन यांचं नाव निश्चित झाल्यानं माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन नाराज झाले आहेत. पक्षाच्या निर्णयावर संतापलेले अच्युतानंदन भर बैठकीतून उठून निघून गेल्याचं वृत्त आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माकपनं केरळ विधानसभेत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. त्यामुळं विजयन व अच्युतानंदन यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस होती. मात्र, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानं ७२ वर्षीय विजयन यांच्या पारड्यात वजन टाकलं. माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अच्युतानंदन यांना पक्षाच्या मुख्यालयात बोलावून ही माहिती देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. विजयन यांच्या नावाला अच्युतानंदन यांचा विरोध असल्यामुळं ते नाराज झाले आणि आल्या पावली पक्षाचे कार्यालय सोडून निघून गेले.

९३ वर्षीय अच्युतानंदन हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ व लोकप्रिय नेते आहेत. मात्र, त्यांचं वय मुख्यमंत्रिपदाच्या आड आल्याचं सांगण्यात येतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज