अ‍ॅपशहर

'त्या' प्लास्टिकच्या अंड्याची तपासणी होणार

कोलकाताच्या बाजारपेठेत चीनची नकली प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची बातमी पसरताच खळबळ माजली होती परंतु ही अंडी आधीपासूनच बाजारात असून ती शरिराला अपायकारक नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Times 4 Apr 2017, 12:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलाकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम plastic eggs a mythhints test on samples
'त्या' प्लास्टिकच्या अंड्याची तपासणी होणार


कोलकाताच्या बाजारपेठेत चीनची नकली प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याची बातमी पसरताच खळबळ माजली होती परंतु ही अंडी आधीपासूनच बाजारात असून ती शरिराला अपायकारक नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार त्या अंड्यामध्ये कोणतेही प्लास्टिक नाही. तसेच या अंड्यामुळे कोणालाही त्रास झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. या अंड्याबाबतच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष असून आम्ही अंड्याबाबतच्या अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत, अशी माहिती कोलकाता महापालिका आरोग्य विभागाचे अतिन घोष यांनी दिली. एका मॉलने बनावट अंडे विकल्याची तक्रार काही रहिवाशांनी केली होती. परंतु रहिवाशांचा आरोप मॉल मालकांनी फेटाळून लावला.

कोलकाता पोलिसांनी या घटनेचा आधीच तपास सुरू केला आहे. रहिवाशी अनिता कुमारी यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी अंडे विक्रेता मोहम्मद शमिम अन्सारी यांना अटक केली. अन्सारीने सुमीत देव आणि गौर चक्रवर्ती यांच्याकडून अंडे खरेदी केल्याने त्या दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली. देव हा एसआरडी इंटरप्रायजेसचा मालक आहे. देवने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पोलिसांनी दोन घाऊक विक्रेत्यांचीही चौकशी केली आहे. प्लास्टिक अंड्यासंबंधी अहवालात काही आढळले तर आम्ही कोर्टात जाऊ, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

प्लास्टिकची अंडे बाजारात विकली जातात यात नवीन आता काही राहिले नाही. केरळमध्ये ऑक्टोबर महिन्यात याबाबतची चर्चा झाली होती. त्या अंड्याची तपासणी केल्यानंतर ती अंडी खाण्याजोेगे असल्याचा अहवाल केरळ अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला होता, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज