अ‍ॅपशहर

coronavirus india: देशात कशी आहे करोनाची स्थिती? PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

देशात सण-उत्सवांचा काळ सुरू झाला आहे. दुसरीकडे देशात करोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज करोनासंबंधी उच्चस्तरीय बैठक घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2021, 11:59 pm
नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी देशातील लसीकरण मोहीम आणि करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत करोनासंबंधी उच्चस्तरीय बैठक झाली. देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे आणि ही लाट अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी ऑक्सिजन पुरवठा वेगाने वाढवण्याचे निर्देश दिले. तसंच करोना व्हायरसचा नवा म्युटंट शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंगचे काम सतत सुरू ठेवले पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi chairs a high level review meeting on covid-19 related situation and vaccination
देशात कशी आहे करोनाची स्थिती? PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक


देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये अजूनही करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ३० जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. देशाच्या निम्म्याहून अधिक १८ वर्षांवरील नागरिकांना करोनाचा किमान १ तरी डोस दिला गेला आहे. तर १८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना करोनाचे दोन डोस दिले गेले आहेत. करोनावरील लसीकरण मोहीमेत ७२ कोटींहून अधिक नागरिकांना लस दिली गेली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली होती.

ganesh festival 2021 : PM मोदींनी महाराष्ट्राला दिल्या गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा, राहुल गांधींचं गणरायाला साकडं

देशात गुरुवारी करोनाचे ३४,९७३ नवीन रुग्ण आढळून आले आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत ही संख्या १९ टक्क्यांहून कमी आहे. गेल्या काही महिन्यात भारताने हॉस्पिटल्समध्ये अनेक बेडची व्यवस्था केली आहे. तसंच १०० हून अधिक ऑक्सिजन टँकर आयात केले आहेत. त्यांची एकूण संख्या ही १,२५० इतकी आहे. तसंच केंद्र सरकारने यादरम्यान १६०० ऑक्सिजन प्लांट्सच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. पण गेल्या महिन्याच्या सुरवातीपर्यंत ३०० हून कमी ऑक्सिजन प्लांट्स उभारले गेले आहेत. कारण आयतीला वेळ लागत आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

coronavirus india : लाल मुंग्यांच्या चटणीने करोना बरा होतो? सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी

महत्वाचे लेख