अ‍ॅपशहर

सिंधूचा विजय खेळाडूंसाठी प्रेरणादायी: मोदी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा इतिहास रचल्याबद्दल स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर संपूर्ण देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. सिंधूचा विजय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत मोदींनी सिंधूचा गौरव केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2019, 8:31 pm
नवी दिल्ली: जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा इतिहास रचल्याबद्दल स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर संपूर्ण देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. सिंधूचा विजय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत मोदींनी सिंधूचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhu2


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून सिंधूचं अभिनंदन केलं आहे. प्रतिभा संपन्न सिंधूने पुन्हा एकदा भारताला गौरव प्राप्त करून दिला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल अभिनंदन, असं ट्विट मोदींनी केलं आहे. सिंधूची बॅडमिंटनशी असलेली समर्पित भावना प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे खेळाडूंच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत मोदींनी तिचा गौरव केला आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सिंधूचा विजय हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. सिंधूची कठोर मेहनत आणि जिद्द यामुळे कोट्यावधी लोकांना प्रेरणा मिळेल, असं कौतुक करतानाच तिला पुढील वाटचालीसाठीही राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत.






मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सिंधूचं अभिनंदन केलं. तू पुन्हा भारताची मान गौरवानं उंचावलीस, असं सचिननं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री किरेन रिजुजू, मोहनदास मेनन, हर्ष भोगले, किदम्बी श्रीकांत आदींनी ट्विट करून सिंधूचं अभिनंदन केलं आहे.





महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज