अ‍ॅपशहर

सब उडे, सब जुडे; मोदींचा नवा नारा

'हवाई' चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई सफर करता यावी आणि देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडला जावा, अशी आमची इच्छा आहे. 'उडान' (उडे देश का आम नागरिक) योजनेमुळे हा हेतू साध्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'सब उडे, सब जुडे' असा नारा दिला.

Maharashtra Times 27 Apr 2017, 4:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सिमला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi going to inaugarate udan from shimla airport today
सब उडे, सब जुडे; मोदींचा नवा नारा


'हवाई' चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई सफर करता यावी आणि देशाचा एक भाग दुसऱ्या भागाशी हवाईमार्गाने जोडला जावा, अशी आमची इच्छा आहे. 'उडान' (उडे देश का आम नागरिक) योजनेमुळे हा हेतू साध्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'सब उडे, सब जुडे' असा नारा दिला.

सिमल्यातील जुब्बरहाटी विमानतळावर आज पंतप्रधान मोदी यांनी 'उडान' योजनेचा शुभारंभ केला. शिमला-दिल्ली विमानाला त्यांना हिरवा झेंडा दाखवला. या योजनेअंतर्गतच, आजपासून नांदेड-हैदराबाद विमानसेवाही सुरू होणार आहे. तसंच, कडप्पा-हैदराबाद ही शहरंही विमानानं जोडली जाणार आहेत.

'उडान' योजनेअंतर्गत सर्वात स्वस्त विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केला होता. ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू झालेल्या 'रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम'च्या माध्यमातून या योजनेला सुरुवात झाली होती. ती आता प्रत्यक्षात साकारली आहे. या योजनेनुसार, ५०० किलोमीटरपर्यंतचा विमान प्रवास २५०० रुपयांत करता येणार आहे. देशातील ७० विमानतळं 'उडान'अंतर्गत जोडली जाणार आहेत. त्यामुळे उद्योग, पर्यटनाला चालना मिळू शकेल.
#WATCH Prime Minister @narendramodi flags off 'Udan': 'Air travel not just for rich' pic.twitter.com/AY6Nh2hFMk — TIMES NOW (@TimesNow) April 27, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज