अ‍ॅपशहर

भाजपचे विकासाचे राजकारणः मोदी

‘भारतीय जनता पक्षातर्फे विकासाच्या राजकारणाला कायमच प्रोत्साहन दिले जाते,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे दिले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करताना मोदी यांनी जातीपातीच्या आणि वशिल्याच्या राजकारणावर टीका केली.

Maharashtra Times 23 Jul 2016, 3:17 am
गोरखपूरः ‘भारतीय जनता पक्षातर्फे विकासाच्या राजकारणाला कायमच प्रोत्साहन दिले जाते,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे दिले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करताना मोदी यांनी जातीपातीच्या आणि वशिल्याच्या राजकारणावर टीका केली. दलितांवरील अत्याचाराच्या मुद्द्याला मात्र त्यांनी बगल दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi lays foundation stone of aiims gorakhpur
भाजपचे विकासाचे राजकारणः मोदी


भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स) पायाभरणी आणि आजारी खत कारखान्याच्या पुनरुज्जीवन सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी राज्य सरकारवर टीका केली. मोदी म्हणाले, ‘तुम्हाला जातीयवादी आणि वशिलेबाज राजकारणाची गरज नाही. आतापर्यंत तुम्ही अनेकांचे खिसे भरले मात्र, तुमचे खिसे रिकामेच राहिले आहेत. तुम्ही लोकसभेतही मला आशीर्वाद दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठीही द्या. खत कारखाना सुरू झाल्याने गोरखपुरात गॅस पुरवठा होणार आहे. तो घराघरांत पोचवला जाईल. जर, वीज आणि गॅस उपलब्ध झाला तर, उद्योगांना अच्छे दिन आपोआपच येतील, ही उत्तर प्रदेशच्या पूर्वोत्तर भागातील औद्योगिक क्रांतीची सुरुवात असेल.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज