अ‍ॅपशहर

pm modi leaves for italy : PM मोदी ५ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना; इटली, ब्रिटनमधील बैठकांमध्ये सहभागी होणार

जी-२० देशांच्या आणि काप-२६ च्या बैठकांसाठी पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान मोदींचा हा ५ दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यात ते इटली आणि ब्रिटनमधील अनेक बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2021, 7:49 am
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी रात्री उशिरा इटली आणि ब्रिटनच्या ५ दिवसांच्या दौऱ्यावर ( pm modi leaves for italy ) रवाना झाले. इटलीत ते २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत असतील. रोममध्ये आयोजित जी-२० देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीला संबोधित करतील. यानंतर पंतप्रधान मोदी हे ब्रिटनमधील ग्लासगो येथे जातील. १ आणि २ नोव्हेंबरलाला ते हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या आयोजित बैठकीत सहभागी होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Prime Minister Narendra Modi leaves for Italy to attend 16th G20 Leaders Summit in Rome
PM मोदी ५ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना; इटली, ब्रिटनमधील बैठकांमध्ये सहभागी होणार


पुढील ५ दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे अनेक बहुराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आणि आयोजनांमध्ये सहभागी होतील. व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, इटलीचे पीएम मोरियो द्रागी, ब्रिटनचे पीएम बोरिस जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचे पीएम स्कॉट मॉरिसन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांशी ते द्विपक्षीय बैठक करतील.

कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार? पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

विदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माहिती दिली. जी-२० देशांच्या बैठकीत सदस्य देशांच्या नेत्यांसोबत करोना संकटानंतर आर्थिक आणि आरोग्यची स्थिती पूर्वपदावर आणण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. करोनाच्या संसर्गानंतर जी-२० सदस्य देश कशा प्रकारे जागतिक अर्थव्यवस्था बळकट करण्यात मदत करू शकतील, यावरही चर्चा होईल. करोनाच्या संकटानंतर जी-२० देशांची ही पहिलीच आमने-सामने बैठक आहे.

rahul gandhi : 'पेट्रोल, डिझेलचे दर १०० रुपये प्रतिलिटरवर, मोदीजी हेच का अच्छे दिन?'

आपल्या ब्रिटन दौऱ्यात १ आणि २ नोव्हेंबर २०२१ ला होणाऱ्या काप-२६ च्या बैठकीत १२० देशांच्या प्रमुखांसोबत पर्यावरण सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. पर्यावरण सुरक्षेवर भारत सरकारने उचललेल्या पावलांची ते माहिती देतील, असं पीएम मोदींनी रवाना होण्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं.

prashant kishor : मोदी असो वा नसो, अनेक दशकं भाजपच शक्तीशाली राहणार,

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज