अ‍ॅपशहर

मोदी, सचिन, विश्वनाथची 'परीक्षा की बात'

'बच्चा, काबिल बनो कोबिल... कामयाबी तो झक मारके पिछे भागेगी...', अशाच आशयाचा उपदेश करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद, ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव आणि आध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला.

Maharashtra Times 28 Feb 2016, 1:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi presents mann ki baat programme on board exams
मोदी, सचिन, विश्वनाथची 'परीक्षा की बात'


'बच्चा, काबिल बनो कोबिल... कामयाबी तो झक मारके पिछे भागेगी...', हा 'थ्री इडियट्स'मधल्या रँचोचा सल्ला आठवतोय?... तशाच आशयाचा उपदेश करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, बुद्धिबळाचा राजा विश्वनाथ आनंद, ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव आणि आध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला.

उद्या संसदेत १२५ कोटी देशवासीय माझी परीक्षा घेणार आहेत. उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण मी घाबरलेलो नाही, असं ठामपणे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला.

मार्च महिना हा परीक्षांचा महिना आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात, वेगानं न धावल्यास कुणीतरी आपल्या पुढे निघून जाईल, अशी भीती प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. शिक्षक आणि पालक त्यात भर घालत असतात. परिणामी, मार्कांची शर्यत जिंकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी - विशेषतः दहावी आणि बारावीचा प्रत्येक जण जीव तोडून धावत असतो. त्यांच्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी, त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून मोदींसह पाच मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणानं संवाद साधला.

आपलं लक्ष्य आपण स्वतःच निश्चित केलं पाहिजे, मार्कांच्या मागे न धावता एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवून चाललं पाहिजे, सकारात्मक विचार केल्यास निकालही सकारात्मकच लागेल, आपली स्पर्धा इतर कुणाशी नव्हे; तर आपल्याशीच असावी, असे काही मोलाचे बोल मोदी, सचिन, विश्वनाथ आनंद, राव आणि मोरारी बापूंनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यातील काही प्रमुख मुद्देः

>> परीक्षा म्हणजे फक्त मार्क, असं समजू नका. एका मोठ्या उद्दिष्टाकडे टाकलेलं ते एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. काहीतरी मोठं उद्दिष्ट ठेवून चालत राहा, ते तुम्हाला निराश न होण्याचं बळ देत राहील. जितकी चिंता पालकांना वाटतेय, तितकीच काळजी मलाही आहे. पण परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास आपण निश्चिंत होऊ शकतो. - नरेंद्र मोदी

>> दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करा. आपल्यातील उणिवा दूर करून सकारात्मक विचार करा. उगाचच मोठ्या आशा बाळगण्यापेक्षा योग्य लक्ष्य निश्चित करून ते गाठण्यासाठी अथक परिश्रम करा. - सचिन तेंडुलकर

>> परीक्षेआधी निराशावादी असू नकाच, पण अति उत्साहीही असू नका. शांत राहा. आवश्यक झोप घेऊन, व्यवस्थित खाऊन परीक्षेला जा. परीक्षेकडे एक आव्हान म्हणून बघा, पण त्याने डळमगून जाऊ नका. - विश्वनाथन आनंद

>> यशाच्या मागे धावू नका. एकाग्र चित्ताने, सुस्पष्ट दृष्टिकोन ठेवून परीक्षा द्या. परीक्षा संपल्यानंतर लगेच मार्कांची बेरीज - वजाबाकी करू नका. जे झालं ते झालं, हे स्वीकारा. - मोरारी बापू

>> आपल्या देशात खूप संधी आहेत. जीवनात काय करायचं हे ठरवून पुढे चला. परीक्षेची चिंता-भीती वाटतेच. पण घाबरून न जाता आपल्यातील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. - सीएनआर राव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज