अ‍ॅपशहर

india coronavirus : PM मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची फोनवर चर्चा, जपानच्या पंतप्रधानांशीही मोदी बोलले

भारतात करोनामुळे निर्माण झालेली स्थितीने चिंता वाढत असल्याने आता अमेरिका आणि जपान मदतीसाठी पुढे आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची फोन चर्चा झाली. यासोबतच जपानच्या पंतप्रधानांसोबतही मोदी फोनवर बोलले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2021, 11:32 pm
नवी दिल्लीः भारतात करोनाने स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. आता काही देश भारताच्या मदतीला धावून आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची सोमवारी फोनवर बातचीत ( pm modi telephonic talks with us president ) झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या मदतीबद्दल आभार, असं त्यांच्याशी झालेल्या बातचीतनतंर पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi - joe biden
PM मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची फोनवर बातचीत, जपानच्या पंतप्रधानांशीही मोदी बोलले


करोनावरील लसीच्या कच्च्या मालावर आणि औषधांची प्रभावी पुरवठा साखळी बनवण्यावर चर्चा केली. भारत आणि अमेरिकेतील हेल्थकेअर पार्टनरशिपने जगासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करू शकेल. दोन्ही देशांमध्ये करोनाने निर्माण झालेल्या स्थितीवर आम्ही विस्तृत चर्चा केली. त्याच्या काही वेळापूर्वी जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर दिली.

बायडन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी केली ट्वीट


अमेरिका औषधं, व्हेंटिलेटर्स आणि आर्थिक मदतीस तयार

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात फोनवर चर्चा होण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या प्रतिनिधी लिंडा थॉमस यांनी भारताला सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. लसीसाठी आवश्यक कच्चा माल, व्हेंटिलेटर्स आणि आर्थिक पाठबळ देण्यास तयार आहे, असं असल्याचं त्या म्हणाल्या.

coronavirus india : 'आता वेळ आलीय घरातही मास्क घालण्याची, पाहुण्यांनाही बोलावू नका'

करोना व्हायरसविरोधात एकजुटीने लढाई करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत विविध देशांमध्ये सहकार्य करणं गरजेचा आहे. भारताला मदत करण्यास तयार असल्याचं जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुना म्हणाले.

india coronavirus : केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना, 'ज्या ठिकाणी एका आठवड्यात १० टक्क्यांहून अधिक

महत्वाचे लेख