अ‍ॅपशहर

PM मोदी पुन्हा टॉपवर! जागतिक नेत्यांच्या सर्वेत १ नंबरवर, पण रेटिंग...

एका जागतिक संस्थेने केलेल्या सर्वेत पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. पण २०२० च्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे रिटिंग घसरले आहे. तरीही पहिल्या क्रमांकावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या प्रमुखांना मागे टाकले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2022, 10:57 am
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागतिक लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका सर्वेदरम्यान जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींची पहिल्या क्रमांकावर निवड ( pm modi topped again in world leaders rating ) झाली आहे. या यादीत पंतप्रधान मोदींना ७१ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली आहे, तर त्यांच्यासह इतर जागतिक नेते रेटिंगच्या बाबतीत खूपच मागे आहेत. हे रेटिंग मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi topped again in world leaders rating says morning consult political intelligence survey
PM मोदी पुन्हा टॉपवर! जागतिक नेत्यांच्या सर्वेत १ नंबरवर, बघा किती मिळाले रेटींग?


अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे प्रमुख पिछाडीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली आणि विकसित देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही मागे टाकले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना ४३ टक्के रेटिंग मिळाले असून ते ६ व्या क्रमांकावर आहेत. कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांनाही ४३ टक्के रेटिंग पॉइंट मिळाले आहेत. पण त्यांचा क्रमांक अमेरिकेच्या अध्यक्षांनंतर येतो. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के अप्रुवल रेटिंग मिळाले आहे.

दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे अध्यक्ष

मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रादार हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ६६ टक्के अप्रुवल रेटिंग मिळाली आहे. त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा आहे. त्यांना ६० टक्के रेटिंग मिळाले आहे. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेच्या यादीत इतर नेत्यांना मागे टाकले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या सर्वेत त्यांची प्रथम क्रमांकावर निवड झाली होती. २०२० च्या तुलनेत मोदींचे रेटिंग अजूनही कमीच आहे. मॉर्निंग कन्सल्टने त्यांच्या मे २०२० च्या अहवालात पंतप्रधान मोदींना ८४ टक्के रेटिंग दिले होते, तर वेबसाइटने मे २०२१ मध्ये त्यांचे रेटिंग ६३ टक्क्यांपर्यंत खाली आणले होते.

PM Modi: पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे विधान; 'भेदभावाला थारा न देणारी यंत्रणाच...'

मॉर्निंग कन्सल्ट कोण आहे आणि ते कसे कार्य करते?

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स जागतिक स्तरावर सरकारी नेत्यांच्या अप्रुवल रेटिंग आणि देशाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी कार्य करते. ही संस्था ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि यूकेसह १३ देशांचा मागोवा घेते. जागतिक नेत्यांची नवीन अप्रुवल रेटिंग १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या ७ दिवसांच्या हलाचालींच्या सरासरीवर आधारित आहेत. मात्र, यासाठी घेतलेल्या नमुन्याचा आकार प्रत्येक देशाच्या लोकसंख्येनुसार वेगवेगळा आहे, असे मॉर्निंग कन्सल्टने म्हटले आहे.

C Voter Survey: देशात आता निवडणुका झाल्यास NDAला बहुमत!; मोदींचा उत्तराधिकारी म्हणून...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज