अ‍ॅपशहर

मोदीजी, बँक घोटाळ्यावर काहीतरी बोला: राहुल

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यावर मौन बाळगल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'दोषी असल्यासारखे वागू नका. काहीतरी बोला,' असं उपरोधिक आवाहन राहुल यांनी मोदी-जेटली यांना केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2018, 3:18 pm
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यावर मौन बाळगल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'दोषी असल्यासारखे वागू नका. काहीतरी बोला,' असं उपरोधिक आवाहन राहुल यांनी मोदी-जेटली यांना केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi wont speak jaitley is in hiding rahul gandhi on nimo fraud
मोदीजी, बँक घोटाळ्यावर काहीतरी बोला: राहुल


कोट्यधीश हिरे व्यापारी नीरव मोदी यानं केलेला बँक घोटाळा सध्या देशभरात गाजत आहे. काँग्रेसनं या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राहुल यांनीही मोदींवर प्रश्नाच्या फैरी झाडल्या आहेत. पंतप्रधानांनी शुक्रवारी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्याचाच संदर्भ देत राहुल यांनी आज मोदींवर ट्विटरद्वारे तिरकस शब्दांत हल्ला चढवला. 'परीक्षेत पास कसं व्हायचं हे सांगण्यासाठी मोदी विद्यार्थ्यांशी दोन तास बोलतात. मात्र, २२ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यावर दोन मिनिटंही बोलत नाहीत. अरुण जेटली हे तर लपूनच बसले आहेत. ते दिसतच नाहीत,' असं राहुल यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज