अ‍ॅपशहर

amarjeet sinha resigns : PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा, मार्चमध्ये पी. के. सिन्हांनी सोडले होते पद

पंतप्रधान मोदींचे सल्लागार असलेल्या अमरजित सिन्हा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. २०१९ पासून ते आतापर्यंत पंतप्रधान मोदींच्या तीन सल्लागारांनी राजीनामा दिला आहे. नृपेंद्र मिश्रा, पी. के. सिन्हा आणि आता अमरजित सिन्हा यांनी राजीनामा दिला आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2021, 7:05 pm
नवी दिल्लीः पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असलेले अमरजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा ( pm modis special advisor amarjeet sinha resigns ) दिला आहे. सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सिन्हा हे पंतप्रधान कार्यालय (PMO) सल्लागार होते. सामाजिक क्षेत्रासंबंधिच्या योजनांची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modis special advisor amarjeet sinha resigns
PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा, मार्चमध्ये पी. के. सिन्हांनी सोडले होते पद


अमरजित सिन्हा हे बिहार कॅडरचे १९८३ च्या बॅचचे आयएएस ( amarjeet sinha resigns ) अधिकारी होते. सिन्हा हे २०१९ मध्ये ग्रामसचिव पदावरून निवृत्त झाले होते. अलिकडच्या काही महिन्यांत पंतप्रधान कार्यलयातून राजीनामा देणारे ते दुसरे वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी मार्चमध्ये पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सल्लागार आणि माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांनी राजीनामा दिला होता.

pm modi launches e rupi : खाबुगिरीला आळा! PM मोदींनी लाँच केले e-RUPI डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म

गेल्या वर्षी फेब्रुवारीत अमरजित सिन्हा यांच्यासह भास्कर खुळबे यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दोन्ही निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली होती. त्यांना सचिवाच्या समान पद आणि वेतन देण्यास मंजुरी दिली गेली होती. करारानुसार ही नियुक्ती २ वर्षांची होती. पुढील आदेशानंतर त्यात वाढही केली गेली असती. पण अमरजित सिन्हा यांनी कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामाच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

nitish kumar : केंद्र सरकारला झटका; पेगासस प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, नितीश कुमारांची मागणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज