अ‍ॅपशहर

Fitness Challenge: विराटचं आव्हान मोदींनी स्वीकारलं

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंज मोहिमेला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं राठोड यांचं आव्हान स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केलं होतं. ते आव्हान मोदींनी आज स्वीकारलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2018, 11:32 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat-modi


केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंज मोहिमेला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं राठोड यांचं आव्हान स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केलं होतं. ते आव्हान मोदींनी आज स्वीकारलं. लवकरच मोदी फिटनेसचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करणार आहेत.

विराटचं आव्हान स्वीकारत असल्याची माहिती पंतप्रधानांनी आज ट्विटरवरून दिली. 'मी विराटचं आव्हान स्वीकारलंय. लवकरच एक व्हिडिओ शेअर करेन', असंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. विराट कोहलीनं ट्विटरवर फिटनेसचा एक व्हिडिओ शेअर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुष्का शर्मा आणि एमएस धोनी यांना टॅग करीत या तिघांना त्यानं फिटनेसचं आव्हान दिलं होतं. या तिघांपैकी सर्वात आधी मोदींनी विराटचं आव्हान स्वीकारलं आहे. अनुष्का शर्मा आणि धोनी यांनी अद्याप विराटने दिलेले आव्हान स्वीकारले नाही.



राज्यवर्धन सिंह राठोड यांनी मंगळवारी पुश-अप्स करीत एक व्हिडिओ ट्विट केला होता. लोकांनीही आपापला 'फिटनेस मंत्र'चा एक व्हिडिओ शेअर करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसंच, विराट, बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना टॅग केलं होतं. राठोड यांचं आव्हान स्वीकारत विराटनं एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज