अ‍ॅपशहर

मोदींकडून नव्या योजनांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी विविध नव्या योजनांची घोषणा करत नववर्षाची भेट दिली आहे. नोटबंदीच्या धक्कादायक निर्णयानंतर ५० दिवसांनी मोदींनी देशाला संबोधित केलं. मोदी आज नवीन कुठला निर्णय घेतात याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

Maharashtra Times 31 Dec 2016, 8:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm narendra modi speech on note ban
मोदींकडून नव्या योजनांची घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी विविध नव्या योजनांची घोषणा करत नववर्षाची भेट दिली आहे. नोटबंदीच्या धक्कादायक निर्णयानंतर ५० दिवसांनी मोदींनी देशाला संबोधित केलं. मोदी आज नवीन कुठला निर्णय घेतात याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. पण कुठलाही कठोर निर्णय जाहीर न करता मोदींनी सर्वसामान्यांसाठी नव्या योजनांचा पाऊस पाडला.

नोटबंदीमुळे गेल्या ५० दिवसात जनतेला अनेक अडीअडचणींना आणि समस्यांचा सामना करावा लागला. तरीही जनता मोठ्या धैर्याने आणि संयमाने सरकारच्या पाठिशी उभी राहिली. सरकारवर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. पण ज्या बँक कर्मचाऱ्यांनी नोटबंदीदरम्यान गैरप्रकार केला आहे त्यांच्यावर सरकार कठोर कारवाई करणार आहे. तसंच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातील लढाई यापुढेही कायम राहिल, असं मोदींनी स्पष्ट केलं.

नोटबंदीचा निर्णय हा 'शुद्धी यज्ञ' होता असं सांगत भीम अॅपच्या माध्यमातून तरुणांना, शेतकऱ्यांना आणि व्यापारी वर्गाला कॅशलेस होण्याचं आवाहन मोदींनी केलं.

मोदींनी केलेल्या नव्या घोषणा

> १२ लाखापर्यंतच्या गृहकर्जावर ३ टक्के सूट

> ९ लाखापर्यंतच्या गृहकर्जावर ४ टक्के सूट

> घराच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना २ लाखाच्या कर्जावर ३ टक्के सूट

> ज्येष्ठ नागरिकांना ७.५ लाख रुपयांच्या दहावर्षाच्या एफडीवर महिन्याला ८ टक्के व्याज देणार

> लघु उद्योगांना १ कोटी ऐवजी २ कोटींचं कर्ज मिळणार

> गर्भवती महिलांसाठी देशव्यापी योजना, केंद्र सरकारची ६ हजार रुपयांची मदत

> शेतकऱ्यांना ६० दिवसांसाठी सरकार कर्ज देणार

> पुढील तीन महिन्यात ३ कोटी किसान क्रेडिट कार्डांना RUPAY कार्डमध्ये बदलणार

> शेतकऱ्यांसाठी सरकार खतं ९ टक्के जास्त खरेदी करणार

> गेल्या वर्षात किमान ३.५ कोटी लोकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज