अ‍ॅपशहर

मेहुल चोक्सीची १२१७ कोटींची संपत्ती जप्त

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मेहुल चोक्सीची १,२१७ कोटींच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात त्याचे मुंबईतील १५ फ्लॅट आणि १७ कार्यालयांचा समावेश आहे. त्याशिवाय कोलकाता येथील एक शॉपिंग मॉल, अलिबाग येथील एका फार्म हाऊससह तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील २३१ एकर जमिनीचाही त्यात समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2018, 3:49 pm
नवी दिल्ली: पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मेहुल चोक्सीची १,२१७ कोटींच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात त्याचे मुंबईतील १५ फ्लॅट आणि १७ कार्यालयांचा समावेश आहे. त्याशिवाय कोलकाता येथील एक शॉपिंग मॉल, अलिबाग येथील एका फार्म हाऊससह तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील २३१ एकर जमिनीचाही त्यात समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pnb fraud ed attaches rs 1217 crore assets of mehul choksi group
मेहुल चोक्सीची १२१७ कोटींची संपत्ती जप्त


मेहुल चोक्सीच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये नाशिक, नागपूर, पनवेल आणि तामिळनाडूतील विल्लूपुरम येथील मालमत्तांचाही समावेश आहे. हैदराबादमधील रंगा रेड्डी जिल्ह्यात त्याचा १७० एकरचा प्लॉट असून त्याची किंमत ५०० कोटी एवढी आहे. एकट्या मुंबईतील बोरिवली पूर्वेलाच त्याचे चार फ्लॅट आहेत. तर सांताक्रुझ पूर्वेला असलेल्या खेमू टॉवर्समध्ये त्याचे नऊ फ्लॅट आहेत. या सर्व जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत तब्बल १,२१७.२ कोटी असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, चोक्सी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या विरोधात आयकर विभागाने यापूर्वीच लुकआऊट नोटीस जारी केली असून आज चोक्सीच्या आर्थिक नाड्याही आवळल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज