अ‍ॅपशहर

दारू, विहीर अन् बॉडी...; दगड बांधूनही निष्प्राण देह तरंगला अन् प्लान फसला; अखेर गूढ उकललं

Crime News: रामगढ जिल्ह्यातील कुजू ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिग्वार गावच्या वेशीबाहेर असणाऱ्या एका विहिरीत एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तिथे पोहोचलं. एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था पाहून हे प्रकरण आत्महत्येचं नसून हत्येचं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2022, 12:37 pm
रामगढ: आरोपी कितीही हुशार असला तरीही तो कधी ना कधी पकडला जातोच. कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतात. झारखंडच्या रामगढमध्ये याचीच प्रचिती देणारी घटना घडली आहे. हत्या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाचं गूढ उकलताच ग्रामस्थांना धक्का बसला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jharkhand news


रामगढ जिल्ह्यातील कुजू ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिग्वार गावच्या वेशीबाहेर असणाऱ्या एका विहिरीत एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तिथे पोहोचलं. एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था पाहून हे प्रकरण आत्महत्येचं नसून हत्येचं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. हत्या जवळपास आठवडाभर आधी झाल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला.
बेबी-अंजली-अफसाना-दिव्याचा भयंकर शेवट; दोनदा धर्मांतर, तीन विवाह; व्हिडीओ कॉलमुळे जीव गेला
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. विहिरीत सापडलेला मृतदेह ५५ वर्षांच्या शिवनारायण कुशवाहाचा होता. शिवनारायणचा मृतदेह अंथरुणात गुंडाळून, दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला होता. मृतदेह पाण्यात बुडावा आणि हत्या प्रकरण कधीच उघडकीस येऊ नये असा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र दगड बांधूनही मृतदेह पाण्यावर आला आणि आरोपींचा प्लान फसला.

मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. शिवनारायणला दारूचं व्यसन होतं. त्याच्या व्यसनाला कुटुंबीय कंटाळले होते. दारू पिऊन तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना चौकशीला बोलावलं. शिवनारायण आठवड्याभरापासून बेपत्ता होते. त्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली होती, असं मृताचा मुलगा गणेशनं सांगितलं.
गर्लफ्रेंडला फिरवायला OLXवर बाईक शोधली; मालकाचं घर गाठलं अन् 'भलताच' गियर टाकला
पोलिसांनी शिवनारायणच्या पत्नीची कसून चौकशी सुरू केली. मात्र ती व्यवस्थित उत्तरं देत नव्हती. दोघे भलतंच काहीतरी सांगत होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी सत्य सांगितलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. गणेश आणि त्याच्या आईनं शिवनारायणची हत्या केली होती. शिवनारायणच्या दारूच्या व्यवसाला दोघे कंटाळले होते. शिवनारायण रोज दोघांना मारहाण करायचा. त्यामुळे गणेशनं आईच्या मदतीनं वडिलांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत फेकला.

हत्या केल्यानंतर आई आणि मुलगा ग्रामस्थांना शिवनारायण बेपत्ता असल्याचं सांगू लागले. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन शिवनारायण बेपत्ता असल्याची तक्रारही दिली. मात्र मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यानं दोघांचा कट फसला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून हत्या प्रकरणामुळे गावात खळबळ माजली आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख