अ‍ॅपशहर

rahul gandhi : राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, 'बॅरिकेड्स हटवले, आता तिन्ही नवीन कृषी कायदेही हटणार'

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांच्या ठिकाणांवरून आता दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स हटवण्यास सुरवता केली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2021, 5:20 pm
नवी दिल्लीः दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेजवळील गाझीपूरमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळावरून नाकेबंदी हटवली जात आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आहे. फक्त दिखाऊ अडथळे दूर झाले आहेत, लवकरच तिन्ही कृषीविरोधी कायदेही दूर केले जातील, असं राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police remove barricading from farmers protest sites rahul gandhi says farm laws would be withdrawn too
राहुल गांधींचं सूचक वक्तव्यं, 'बॅरिकेड्स हटवले, सरकार आता तिन्ही कृषी कायदेही हटवणार'


राहुल गांधींचे ट्विट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी ट्विट केलं आहे. आता फक्त दिखाऊ अडथळे दूर केले आहेत, लवकरच तिन्ही कृषीविरोधी कायदेही हटवले जातील. अन्नदाता सत्याग्रह झिंदाबाद!, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेजवळील गाझीपूरमधील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणाहून बॅरिकेड्स आणि काटेरी तारा हटवण्यास सुरुवात केली.

प्रशांत किशोर यांच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेसला संशय; TMC ने हात झटकले

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला दिल्लीत 'ट्रॅक्टर परेड' दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी तिथे लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावल्या होत्या. तेव्हापासून यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. तसंच शेतकऱ्यांनी आंदोलन करावं, पण रस्ते अडवणं चुकीचं आहे, असं सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. त्यानंतर हे बॅरिकेड्स हटवण्यात येत आहेत. आम्ही कोणताही रस्ता अडवलेला नाही. दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत, असं आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी म्हटलं होतं. यापूर्वी टिकरी सीमेवरून बॅरिकेड्सही हटवण्यात आले आहेत.

प्रशांत किशोर यांचे काँग्रेसबाबत मोठे वक्तव्य, भाजपने दिली प्रतिक्रिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज