अ‍ॅपशहर

फयाज यांच्या हत्येमागे हिजबुल

काश्मीरमधील शहीद लेफ्टनंट उमर फयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय असून हे भ्याड कृत्य करणाऱ्या सहा दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.

Maharashtra Times 11 May 2017, 9:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police suspect hizbul hand in killing of young kashmiri army officer
फयाज यांच्या हत्येमागे हिजबुल


शहीद लेफ्टनंट उमर फयाज यांच्या हत्येमागे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय असून हे भ्याड कृत्य करणाऱ्या सहा दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.

दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात उमर फयाज यांचा मृतदेह आढळला होता. रजेवर असलेले फयाज नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता तिथून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना लष्कराने फयाज यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कंबर कसली आहे.

ही हत्या हिजबुल मुजाहिदीनच्या सहा दहशतवाद्यांनी घडवल्याची पक्की खबर सुरक्षा यंत्रणांना लागली असून लवकरच या दहशतवाद्यांना जिवंत वा मृत पकडलं जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. फयाज यांच्या हत्येबाबत काश्मीरमधील नागरिकांच्याही संतप्त भावना असून स्थानिक लोक लष्करासोबत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. फयाज यांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या दगडफेकीमागे चिथावणीखोरांचा हात असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज