अ‍ॅपशहर

prakash jadhav award kirti chakra : अभिमानाने उर भरून येईल असा पराक्रम... प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्तीचक्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रकाश जाधव यांचा मरणोत्तर किर्तीचक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रकाश जाधव यांची पत्नी आणि आईने हा पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2021, 10:58 pm
नवी दिल्लीः राष्ट्रीय रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये इंजीनिअर कॉर्प्समधील सॅपर प्रकाश जाधव यांचा मरणोत्तर किर्तीचक्राने गौरव करण्यात आला. हा शांतता काळातील दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्रकाश जाधव यांची पत्नी राणी प्रकाश आणि आई शारदा जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash jadhav award kirti chakra
अभिमानाने उर भरून येईल असा पराक्रम... प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्तीचक्र


काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात २७ नोव्हेंबर २०१८ ला रेडबानी बाला गावात दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी मोहीमेचे नेतृत्व करत असलेले प्रकाश जाधव हे घरात घुसले. त्यांना जिन्याने वर येताना पाहून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

प्रकाश जाधव यांनी दहशतवाद्यांचा गोळीबार आपल्या अंगावर घेतला आणि सहकाऱ्यांना वाचवले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बाजूला ढकलले. यावेळी दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. प्रकाश जाधव यांनी सहकाऱ्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांना लक्ष्य केले. पण ते जखमी झाले होते.


shaurya chakra for major vibhuti dhoundiyal : I Love you विभूती... शहीद मेजर आणि लेफ्टनंट पत्नीची कहाणी

अभिनंदन यांना वीरचक्र, चहाचा उल्लेख करत पाकिस्तानचा जळफळाट

जखमी असतानाही जाधव यांनी दुसऱ्या दहशतवाद्यालाही त्यांनी ठार केले. पण पेट्रोल बॉम्बमुळे घराला लागलेली आग भीषण झाली होती. त्यांनी आपले प्राण धोक्यात घालून आपल्या सहकाऱ्यांना घराबाहेर पाठवले होते. पण घराला लागलेल्या आगीमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. भीषण आगीमुळे होरपळून ते शहीद झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज