अ‍ॅपशहर

यूपी पोलिसाचा 'तो' व्हिडिओ प्रियांका गांधींनी केला शेअर, विचारला जाब

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. छेडछाडीची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या या महिलेलाच पोलिसाने उलटसुलट प्रश्न विचारून झाल्या प्रकाराबद्दल दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलेला या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ ट्वि्ट करून प्रियांका यांनी उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अन्यायाला वाचा फोडली आहे. महिलांना न्याय देण्याची पहिली पायरी त्यांचं म्हणणं ऐकून घेणं ही आहे, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2019, 7:17 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uttar-pradesh

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. छेडछाडीची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या या महिलेलाच पोलिसाने उलटसुलट प्रश्न विचारून झाल्या प्रकाराबद्दल दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलेला या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ ट्वि्ट करून प्रियांका यांनी उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अन्यायाला वाचा फोडली आहे. महिलांना न्याय देण्याची पहिली पायरी त्यांचं म्हणणं ऐकून घेणं ही आहे, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील एका पोलीस ठाण्यातील आहे. एक महिलेची एका टोळक्याने छेडछाड केली, त्यांचा प्रतिकार करणाऱ्या तिच्या भावाला त्यांनी मारझोड केली. हा प्रकार ही महिला आणि तिचे आईवडील पोलिसांना सांगत असताना पोलिसाने या महिलेलाच उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पोलिसाने तिला तिने घातलेल्या दागिन्यांबद्दल विचारलं आणि त्यावरूनच तू कशी आहेस हे कळतं, असा शेरा मारला.

'एकीकडे उत्तर प्रदेशमधील महिलांविरुद्ध होणारे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत, दुसरीकडे कायद्याच्या रक्षकांकडूनच असं वर्तन?,' असा सवाल प्रियांका यांनी विचारला आहे. उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचारांवर प्रियांका सातत्याने आवाज उठवत योगी आदित्यनाथ सरकारला जाब विचारत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज