अ‍ॅपशहर

अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या बऱ्या: भाजप आमदार

आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. सुरेंद्र सिंह यांनी सरकारी अधिकाऱ्यांची तुलना वेश्यांबरोबर केली आहे. 'अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचं चारित्र्य चांगलं आहे,' असं म्हणत सिंह यांनी खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2018, 11:19 am
लखनऊ:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prostitutes are better than government officials bjp mla surendra singh
अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या बऱ्या: भाजप आमदार


आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. सुरेंद्र सिंह यांनी सरकारी अधिकाऱ्यांची तुलना वेश्यांबरोबर केली आहे. 'अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचं चारित्र्य चांगलं आहे,' असं म्हणत सिंह यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सुरेंद्र सिंह हे बैरियामधून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. 'अधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचं चारित्र्य चांगलं असतं. त्या पैसे घेऊन आपलं काम तरी करतात. स्टेजवर नाचतात. मात्र हे अधिकारी पैसे घेऊन काम करतील की नाही याची काही शाश्वती नसते,' असं सिंह म्हणाले. यापूर्वीही सिंह यांनी अशीच बेताल विधानं केली होती. 'लोकसभा निवडणुकीत दोन संस्कृतींमध्ये युद्ध होईल. हे धर्म युद्ध असेल. हे कौरव-पांडवांमधलं युद्ध असेल. या आधुनिक पांडवाच्या दलाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करतील तर कौरवांचं नेतृत्व मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव करतील. मात्र विजय मोदींचाच होईल,' असं ते म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज