श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार महंमद अकबर लोण यांचा मुलगा हिलाल याच्यावर सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) कारवाई करण्यात आली. हिलाल हा ५ ऑगस्टपासून स्थानबद्ध असून, काश्मीर प्रशासनातर्फे उपायुक्त कार्यालयाने एका अहवालाद्वारे ही माहिती दिली. हिलालची सुटका केल्यास उत्तर काश्मीरच्या कायदा व सुव्यवस्था स्थितीस धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. उमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्र्यांसह काश्मीर प्रशासनाने ५ फेब्रुवारीपासून एकूण पाच जणांवर पीएसए अंतर्गत कारवाई केली आहे.
हिलाल लोणवरही पीएसए कारवाई
नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार महंमद अकबर लोण यांचा मुलगा हिलाल याच्यावर सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) कारवाई करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 4:00 am