पुदुच्चेरी : केंद्र शासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस - डीएमके आघाडीच्या व्ही नारायणसामी सरकारविरुद्द संकट गडद झालंय. आज (सोमवारी) विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव सादर करण्यात आला. यावेळी चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सदनात आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केलाय. नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी आज सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवण्यात आल्यानंतर सौंदरराजन यांनी पदभार स्वीकारलाय.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याअगोदर रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या निवासस्थानी पक्ष आणि सहकारी दलांच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.
विधानसभेत दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी 'सरकार कसं वाचवणार?' असा सवाल केला. यावर आपल्या रणनीतीचा खुलासा सदनातच करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
उल्लेखनीय म्हणजे, विश्वासदर्शक ठरावापूर्वी काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारयणन आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेशन यांच्या राजीनाम्यानंतर ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस - द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या घटल्यानंतर ११ वर आलीय. तर विरोधी पक्षाकडे १४ आमदार आहेत.