अ‍ॅपशहर

अजब शिक्षा! दारू प्यायल्यास गावाला मटण पार्टी

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये दारूबंदीचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य राज्यांमध्येही दारूबंदीसाठी कठोर नियम लागू केले आहेत. पण दारूबंदी असलेल्या गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील खाटीसितारा गावात दारू पिणाऱ्याला अजब शिक्षा करण्यात जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 2:05 pm
अहमदाबाद: महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये दारूबंदीचे प्रयत्न सुरू आहेत. अन्य राज्यांमध्येही दारूबंदीसाठी कठोर नियम लागू केले आहेत. पण दारूबंदी असलेल्या गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील खाटीसितारा गावात दारू पिणाऱ्याला अजब शिक्षा करण्यात जाणार आहे. दारू पिताना एखाद्याला पकडलं तर, शिक्षा म्हणून आख्ख्या गावाला मटण पार्टी द्यावी लागणार आहे. याशिवाय दोन हजार रुपये दंडही वसूल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम liquor


बनासकांठा जिल्ह्यातील खाटीसितारा हे गाव आदिवासीबहुल आहे. गावात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारूड्यांमुळे गावात हिंसा आणि हत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दारूचे व्यसन जडलेल्यांची यातून सुटका करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. दारू पिताना एखादा सापडला तर, त्याच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय त्याला आख्ख्या गावाला मटण पार्टी द्यावी लागणार आहे. २०१३-१४मध्येही हा नियम गावात लागू करण्यात आला होता.

'जर कुणी दारू पिताना सापडला तर त्याच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. जर दारू प्यायल्यानंतर कुणी गोंधळ घातला तर त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याशिवाय गावातील ७५०-८०० लोकांना मटण पार्टी द्यावी लागेल. ही दंडवसुली अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्टीसाठी जवळपास २० ते २५ हजार रुपये खर्च येतो,' अशी माहिती सरपंच खिमजी दुंगइसा यांनी दिली. तळीरामांकडून दंडवसुली करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नियम लागू झाल्यानंतर सुरुवातीला वर्षाला तीन ते चार लोकांना दारू पिताना पकडलं होतं. मात्र, २०१८मध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एका व्यक्तीला पकडलं आहे. चालू वर्षी एकही प्रकरण समोर आलेले नाही. 'गावात दारू पिऊन गोंधळ घालताना शेजारच्या गावातील नानजी दुंगइसा याला पकडलं होतं. इतकंच नाही तर शेजारील उपाला गावातील लोकांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी राजस्थानमधून दारू खरेदी करणेही बंद केले आहे, अशी माहिती संरपंच खिमजी यांनी दिली.

दारू पिऊन आलेल्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

दारूच्या नशेतील शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज