अ‍ॅपशहर

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

CM Captain Amrinder Singh :आज सायंकाळी ४.३० मिनिटांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेत ते आपल्या निर्णयाची माहिती देण्याची शक्यता आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2021, 5:18 pm
चंदीगड : पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शनिवारी सायंकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीपूर्वीच आपला राजीनामा सोपवला. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाब राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. अमरिंदर सिंह यांच्या मुलाने सोशल मीडियावर ट्विट करून ही माहिती दिलीय. कॅप्टन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम CM Captain Amrinder Singh resign
राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कॅप्टन अमरिंदर सिंह



राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंह राजभवनात दाखल झाले. तत्पूर्वी, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आज सायंकाळी ४.३० मिनिटांनी कॅप्टन मीडियाशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी दिली होती.


दुसरीकडे, काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीपूर्वी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील जाखड यांच्या एका ट्विटनं काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय. 'राहुल गांधी यांनी पंजाबमधल्या वादावर समाधानकारक मार्ग काढला आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते खुश आहेत' असं ट्विट जाखड यांनी केलंय.

कॅप्टनविरोधी ६० आमदारांनी पक्ष सोडून 'आप'मध्ये दाखल होण्याची धमकी दिल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून अमरिंदर सिंह यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात आल्याचं समजतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज