अ‍ॅपशहर

Sidhu होत आहेत ट्रेंड, लोकांनी लिहिलं- 'यावेळी जनतेनेच यांना ठोकलं'

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विजय होत आहे. दरम्यान, #Sidhu सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यावर लोकांनी सिद्धूशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. काही त्यांना सल्ले देत आहेत, तर काहींनी त्यांना आम आदमी पार्टीपासून अंतर ठेवण्यास सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2022, 4:33 pm
Punjab Election 2022- पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची आघाडी कायम आहे. पण #Sidhu सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अमृतसर पूर्व जागेबाबत बरीच चर्चा आहे. काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू आणि बिक्रम सिंह मजिठिया यांच्यात लढत होईल असे मानले जात होते. मात्र याच्या उलट आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन ज्योत कौर यांचा विजय होताना दिसत आहे. मजिठिया आणि सिद्धू दोघेही मागे पडले. दरम्यान, सिद्धू यांनी एक ट्वीट केलं, ज्यावर लोक त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नवज्योत सिंग सिद्धू




या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. पंजाबमधील लोकांचे मत मी नम्रपणे स्वीकारतो. AAP चे अभिनंदन. या ट्विटवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.




सिद्धी यांच्या ट्वीटवर लोकांनी मजेशीर कमेंट केल्या. ते म्हणतात की, 'सिद्धू साहेब आता रिकाम टेकडे झाले आहेत.' लोकांनी त्यांना आम आदमी पार्टीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कारण पंजाबमध्ये लोकांना आणखी नाटक आणि कॉमेडी नको आहे.



ट्विटरवर लोकांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पुन्हा टीव्ही जॉईन करण्याचा सल्लाही दिला.



दरम्यान, मजिठिया आणि सिद्धू दोघंही अमृतसर पूर्व जागेसाठी एकमेकांविरुद्ध लढत होते. बिक्रम सिंग मजिठिया अकाली दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून पंजाब निवडणुकीच्या निकालामुळे कोर्टाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज