अ‍ॅपशहर

Forbes यादीत सिंधू आणि अनुष्का

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या तिघीही फोर्ब्सच्या यादीत झळकल्या आहेत. फोर्ब्सने आशियातील 'मनोरंजन आणि क्रिडाक्षेत्रा'तील नामवंतांची यादी जाहीर केली असून त्यात या तिघींचा समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या या '३० अंडर ३० अशिया' यादीत भारताने अव्वल स्थान पटकावलं असून चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2018, 8:43 pm
नवी दिल्ली: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या तिघीही फोर्ब्सच्या यादीत झळकल्या आहेत. फोर्ब्सने आशियातील 'मनोरंजन आणि क्रिडाक्षेत्रा'तील नामवंतांची यादी जाहीर केली असून त्यात या तिघींचा समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या या '३० अंडर ३० अशिया' यादीत भारताने अव्वल स्थान पटकावलं असून चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pv sindhu smriti mandhana in forbes 30 under 30 asia list
Forbes यादीत सिंधू आणि अनुष्का


फोर्ब्सने '३० अंडर ३० अशिया' यादीत ३०० उद्योन्मुख प्रतिभावंतांचा समावेश केला आहे. या यादीत भारताच्या ६५ प्रतिभावंतांना स्थान मिळाले असून भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या ५९ प्रतिभावंतांचा या यादीत समावेश झालेला आहे. काही तरी हटके आणि वेगळं करणाऱ्या प्रतिभावंताना या यादीत मानाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यासाठी फोर्ब्सने एकूण १० श्रेणी तयार केल्या असून या यादीत आशिया पॅसिफिकमधील २५ देशांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीत उत्तर कोरिया आणि अझरबैजान या देशांना पहिल्यांदाच स्थान मिळालं आहे. ऑनलाइन मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली. फोर्ब्सने तयार केलेल्या जवळपास सर्वच श्रेणींमध्ये भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. तर तंत्रज्ञानातील श्रेणीत चीनने दबदबा निर्माण केला आहे.

भूमिका अरोराचा समावेश

इंडियन नॅशनल पोलो टीमचा कर्णधार पद्मनाभ सिंह, अंकित प्रसाद, प्रिया प्रकाश, बाला सरदा, सुहानी जलोटा, राहुल ज्ञान, श्रेयस भंडारी, रमेश धामी आणि भूमिका अरोरा आदी भारतीयांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या देशाचे किती तरूण...

भारत - ६५

चीन - ५९

ऑस्ट्रेलिया - ३५

दक्षिण कोरिया- २५

जपान - २१

हाँगकाँग - १२

पाकिस्तान- ७

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज