अ‍ॅपशहर

RSSने राबडीमुळे ड्रेस बदलला: लालू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेषाचं श्रेय माझी पत्नी राबडी देवीला जातं, असं म्हणत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा आरएसएसच्या बदललेल्या गणवेषावर टोलेबाजी केली आहे.

Maharashtra Times 14 Mar 2016, 8:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पाटणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rabri devi forced rss to change uniform rjd chief lalu prasad yadav
RSSने राबडीमुळे ड्रेस बदलला: लालू


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेषाचं श्रेय माझी पत्नी राबडी देवीला जातं, असं म्हणत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा आरएसएसच्या बदललेल्या गणवेषावर टोलेबाजी केली आहे.

आरएसएसच्या गणवेषात हाफ पँटच्या जागी फुल पँट आल्यानंतर त्यावर खमंग चर्चा सुरू झाली आहे. लालूंनी कालच या नव्या गणवेषावर निशाणा साधताना सत्ता आल्याने आरएसएस 'अप टू डेट' झाली आहे. मात्र, आम्ही पुन्हा त्यांना हाफ पँटमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशी टिपण्णी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा लालूंनी आरएसएसला चिमटा घेताना या नव्या गणवेषाचं क्रेडिट राबडीला जातं, असं ट्विट केलं आहे.

बिहार निवडणुकीच्या धामधुमीवेळी राबडी यांनी आरएसएसवर टीका केली होती. संघातील वयोवृद्ध लोकही हाफ पँट घालतात. त्यांना काही वाटत कसं नाही?, असा सवाल राबडी यांनी केला होता. त्याचाच दाखला देत लालू यांनी आरएसएसच्या नव्या गणवेषाचं क्रेडिट राबडी यांना दिलं. राबडीच्या मार्मिक टिपण्णीमुळे आरएसएसला दोन महिन्यांत गणवेष बदलावा लागला, असे लालू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज