अ‍ॅपशहर

rafale deal: राहुल यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला, सीतारामन यांची टीका

राफेलच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पहिला परिच्छेदही वाचला नाही. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोर्टाने राफेलची याचिका स्वीकारली असून कोर्टानेही 'चौकीदार चोर है' हे मान्य केल्याचं राहुल यांचं म्हणणं आहे. राहुल यांचं हे म्हणणं साफ खोटं असून राहुल यांनी खोटं बोलून कोर्टाचा अवमान केलाय, अशा शब्दांत सीतारामन यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2019, 5:34 pm
नवी दिल्ली: राफेलच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पहिला परिच्छेदही वाचला नाही. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोर्टाने राफेलची याचिका स्वीकारली असून कोर्टानेही 'चौकीदार चोर है' हे मान्य केल्याचं राहुल यांचं म्हणणं आहे. राहुल यांचं हे म्हणणं साफ खोटं असून राहुल यांनी खोटं बोलून कोर्टाचा अवमान केलाय, अशा शब्दांत सीतारामन यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nirmala-sitharaman


राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर राहुल गांधी यांनी कोर्टानेही 'चौकीदार चोर है' असं म्हटलं होतं. त्यावर सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्या आरोपांचं खंडन केलं. राहुल गांधी स्वत: जामिनावर आहेत. राजकीय मर्यादांचं उल्लंघन करत ते देशाची दिशाभूल करत आहेत. कोर्टाने जे म्हटलंच नाही, अशा गोष्टी कोर्टाने म्हटल्याचं सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीका सीतारामन यांनी केली.

राफेल प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची विनंती अमान्य करत, लीक दस्तावेज वैध असून, विचाराधीन असलेल्या दस्तावेजांच्या आधारे नव्याने सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. हा केंद्र सरकारला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज