अ‍ॅपशहर

तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केलं?

'राहुलबाबा, तुम्ही मोदींकडे तीन वर्षांचा हिशेब मागत असाल तर त्याआधी तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केलं, याचं उत्तर आधी द्यायला हवं', अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज गांधी परिवारावर निशाणा साधला.

Maharashtra Times 10 Oct 2017, 5:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul baba what have your grandmother father or you done for amethi asks bjps amit shah as he launches 2019 campaign
तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केलं?


'राहुलबाबा, तुम्ही मोदींकडे तीन वर्षांचा हिशेब मागत असाल तर त्याआधी तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केलं, याचं उत्तर आधी द्यायला हवं', अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज गांधी परिवारावर निशाणा साधला.

'इतकी वर्षे आपण अमेठीचे खासदार असताना जिल्हाधिकारी कार्यालय, क्षय रुग्णालय, एफएम स्टेशन, यासारख्या सुविधाही तुम्ही का देऊ शकला नाहीत', असा सवालही शहा यांनी केला. यावेळी मोदी सरकारने गरीब, शेतकरी, आदिवासी, युवक यांच्यासाठी राबवलेल्या विविध १०६ योजनांची यादी शहा यांनी झळकावली. तुमचे पणजोबा, आजी, वडील, आई आणि तुम्ही सगळेच सत्तेत राहिलात. अमेठी तुमचा बालेकिल्ला राहिला मात्र भाजप सरकार येईपर्यंत अमेठीला विकासासाठी वाट पाहावी लागली, असा टोला शहा यांनी लगावला.

अमेठीतील विविध विकास कामांचा शुभारंभ अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी शहा बोलत होते. गांधी मॉडेल आणि मोदी मॉडेल अशी विकासाची दोन मॉडेल देशात आहेत. यातील गांधी मॉडेलने ७० वर्षांत कोणताही विकास झाला नाही तर मोदी मॉडेलने विकास साधला जात असून या सगळ्याचा हिशेब भाजप २०१९ मध्ये तुम्हाला देणार आहे, असेही शहा म्हणाले. गुजरातमध्ये जाऊन विकासाची खिल्ली उडवण्यापेक्षा अमेठीच्या विकासासाठी प्रयत्न करा, असा टोलाही शहा यांनी राहुल यांना लगावला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज