अ‍ॅपशहर

हाफिजची सुटका; राहुल गांधींचा मोदींना टोला

२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेमुळं भारतातील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. हाफिजच्या सुटकेचं निमित्त करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. 'नरेंद्र भाई, ट्रम्प यांच्याशी झालेली गळाभेट व्यर्थ गेली,' असा राहुल यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 25 Nov 2017, 2:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi mocks narendra modi after pak releases hafiz saeed
हाफिजची सुटका; राहुल गांधींचा मोदींना टोला

२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेमुळं भारतातील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. हाफिजच्या सुटकेचं निमित्त करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. 'नरेंद्र भाई, ट्रम्प यांच्याशी झालेली गळाभेट व्यर्थ गेली,' असा राहुल यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी सरकारच्या नजरकैदेत असलेला जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईद याची नुकतीच सुटका झाली आहे. त्यातच, दहशतवादविरोधी लढाईचा आव आणणाऱ्या अमेरिकेनं टेरर फंडिंग प्रकरणात पाकिस्तानी लष्कराला क्लीन चिट दिली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. 'नरेंद्र भाई, गळाभेटीची मुत्सद्देगिरी फसलीय. लवकरात लवकर आणखी मिठ्या मारण्याची गरज आहे,' असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. Narendrabhai, बात नहीं बनी. Terror mastermind is free. President Trump just delinked Pak military funding from LeT. Hugplomacy fail. More hugs urgently needed.https://t.co/U8Bg2vlZqw — Office of RG (@OfficeOfRG) November 25, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज