अ‍ॅपशहर

राहुल गांधींनी पाकमध्ये पाठवलं नाहीः सिद्धू

माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यापूर्वी तथ्य जाणून घ्या. राहुल गांधी यांनी मला पाकिस्तानमध्ये जाण्यास कधीच सांगितलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वैयक्तिक निमंत्रणावरून मी पाकला गेलो होतो. हे जगाला माहिती आहे, असं घुमजाव काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2018, 4:19 pm
नवी दिल्लीः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Navjyot-Singh-Siddhu


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून मी पाकिस्तानमध्ये गेलो नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावरून मी पाकिस्तानमध्ये गेलो, असं घुमजाव काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यापूर्वी तथ्य जाणून घ्या. राहुल गांधी यांनी मला पाकिस्तानमध्ये जाण्यास कधीच सांगितलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वैयक्तिक निमंत्रणावरून मी पाकला गेलो होतो. हे जगाला माहिती आहे, असं स्पष्टीकरण सिद्धू यांनी ट्विटरवरून दिलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानात जाण्यास सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट सिद्धू यांनी बंगळुरू येथील एका पत्रकार परिषदेवेळी केला होता. राहुल गांधी माझे कॅप्टन असून त्यांच्या सांगण्यावरून मी सगळ्या ठिकाणी जात होतो, असं सिद्धू म्हटले होते. वास्तविक पाहता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानात जाण्यापासून मला रोखले होते. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांनी आग्रह केल्यावर मी पाकिस्तानात गेलो, असं सिद्धू यांनी सांगितलं होतं. दरम्यान, करतारपूर कॉरिडॉरच्या भूमिपूजनापासून सुरू झालेला हा वाद अजूनही शमताना दिसत नाहीये.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज