अ‍ॅपशहर

राहुल यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना माघारी धाडले

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर भेटीवर गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरूनच माघारी धाडण्यात आले आहे. सर्व नेत्यांना प्रशासनाने विमानतळावरच रोखले व दिल्लीला परत पाठवले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2019, 5:39 pm
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर भेटीवर गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरूनच माघारी धाडण्यात आले आहे. सर्व नेत्यांना प्रशासनाने विमानतळावरच रोखले व दिल्लीला परत पाठवले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-gandhi


जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर काश्मीरमधील आताची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेलं होतं. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, के. सी. वेणुगोपाल, आनंद शर्मा, माकप नेते सीताराम येचुरी, द्रमुक नेते तिरुची सीवा, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, भाकपचे डी. राजा, राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन, राजद नेते मनोज झा, जेडीएसचे कुपेंद्र रेड्डी आणि शरद यादव या नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

दरम्यान, या दौऱ्यास प्रशासनाने आधीच मनाई केली होती. राहुल व अन्य नेत्यांनी सद्यस्थितीत काश्मीरमध्ये येऊ नये, अशी विनंती कालच करण्यात आली होती. त्यानंतरही हे नेते दौऱ्यावर ठाम राहिले. परिणामी श्रीनगर विमानतळावर हे नेते पोहचताच तिथेच त्यांना रोखण्यात आले. विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगीही नेत्यांना देण्यात आली नाही. सुरक्षेचं कारण देत आल्यापावली या सर्व नेत्यांना दिल्लीत धाडण्यात आले. यादरम्यान विमानतळावर काही काळ गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज