अ‍ॅपशहर

अंबानींचं घर वगळता मोदींशी कुठेही चर्चेस तयार: राहुल

​​पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्याशी चर्चा करण्याचं मी खुलं आव्हान देत आहे. त्यांनी दहा मिनिटं का होईना माझ्यासमोर चर्चेला बसावं, असं आव्हान देतानाच ते सांगतील त्या ठिकाणी येऊन मी चर्चा करायला तयार आहे. फक्त एका ठिकाणीच मी येऊ शकणार नाही. ते म्हणजे उद्योगपती अनिल अंबानी यांचं घर, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2019, 3:23 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-gandhi15


पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्याशी चर्चा करण्याचं मी खुलं आव्हान देत आहे. त्यांनी दहा मिनिटं का होईना माझ्यासमोर चर्चेला बसावं, असं आव्हान देतानाच ते सांगतील त्या ठिकाणी येऊन मी चर्चा करायला तयार आहे. फक्त एका ठिकाणीच मी येऊ शकणार नाही. ते म्हणजे उद्योगपती अनिल अंबानी यांचं घर, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे आव्हान दिलं. राहुल गांधी प्रत्येक पत्रकार परिषदेत आणि निवडणूक रॅलीमध्ये अनिल अंबानींवर टीकास्त्र सोडत आहेत. मोदी आणि अंबानींचं साटंलोटं असल्याचा आरोप ते सातत्याने करत आहेत. राफेल कराराच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेचा पैसा मोदींनी अंबानीच्या खिशात घातल्याचा आरोप करतानाच राफेल कराराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. मोदींनी नियमांना डावलून अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा पोहोचवला असल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी मोदींना वादविवाद करण्यासाठी समोरासमोर बसण्याचं आव्हानही दिलं आहे. मात्र कुठेही चर्चेसाठी येईन, पण अंबानीच्या घरी चर्चेला येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज