अ‍ॅपशहर

मी धर्माचा व्यापार करत नाही: राहुल गांधी

सोमनाथ मंदिरातील अहिंदूंसाठी असलेल्या नोंदवहीत नाव नोंदवल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला उत्तर देत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 'आपण धर्मासारख्या वैयक्तिक गोष्टीचा धंदा करत नाही' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2017, 10:43 pm
भावनगर (गुजरात): सोमनाथ मंदिरातील अहिंदूंसाठी असलेल्या नोंदवहीत नाव नोंदवल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला उत्तर देत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 'आपण धर्मासारख्या वैयक्तिक गोष्टीचा व्यापार करत नाही' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपला टोला लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi responds to somnath issue calls himself shivbhakt
मी धर्माचा व्यापार करत नाही: राहुल गांधी


भाजपच्या टीकेला उत्तर देताना, 'आपली आजी इंदिरा गांधी आणि आपले कुटुंब शिवभक्त आहे', असेही राहुल गांधी म्हणाले. आपला धर्म कोणता यासाठी आपल्याला कोणाच्या दाखल्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

'धर्म ही आपली वैयक्तिक बाब आहे आणि ती आपण वैयक्तिकच ठेवतो' अशा शब्दात राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिराच्या भेटीनंतर उद्भवलेल्या वादाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी त्यांच्या नावाची नोंद अहिंदू व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत केली. राहुल गांधी यांना अहिंदूंसाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत आपल्या नावाची नोंद का करावी लागली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यामागे भाजप असल्याचा आरोपही काँग्रेसकडून केला जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी हे केवळ हिंदू नसून, ते जानवेधारी हिंदू आहेत असे म्हणत भाजपवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने सुरजेवाला यांच्या या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले. यानंतर आपण शिवभक्त असल्याचे सांगत धर्म ही खासगी बाब असून आपण धर्माचा व्यापार करत नाही अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज