अ‍ॅपशहर

rahul gandhi : करोनाचा वाढता प्रादुर्भाव; राहुल गांधींनी बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

पश्चिम बंगालमध्ये विधानसबा निवडणूक सुरू आहे. निवडणुकीसाठी अजून ३ टप्प्यातलं मतदान बाकी आहे. पण देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पश्चिम बंगालमध्येही करोना रुग्ण वाढत आहे. यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या सर्व प्रचासभा रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2021, 1:35 pm
नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसने वाढती रुग्णसंख्या पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. राहुल गांधी यांनी या ट्वीटमधून सर्व राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. करोनाच्या स्थितीत मोठ्या प्रचारसभा घेण्याचा परिणाम काय होईल, याचा विचार नेत्यांनी करावा, असं राहुल गांधी म्हणाले. प्रचारसभा रद्द करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi
राहुल गांधींच्या बंगालमधील सर्व सभा रद्द; म्हणाले, 'गर्दीचा काय परिणाम होईल, याचा विचार नेत्यांनी करावा'


पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या एका प्रचारसभेला झालेली गर्दी पाहून त्यांनी राहुल गांधी नेत्यांना इशारा दिला. एवढी गर्दी आपण प्रथमच बघितली, असं राहुल गांधी म्हणाले. करोना रुग्ण आणि त्याने होणारे मृत्युही आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बघितले, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. सरकार करोनाने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

मध्य प्रदेशात ऑक्सिजन अभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांचा टाहो

पंतप्रधान मोदींमुळे देशात करोनोने विद्ध्वंसक स्थिती निर्माण केली आहे. स्मशान आणि कबरस्तात ... जे म्हणाले ते केलेच. काही हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार होत नाहीए. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मिळत नाही, लस नाहीए. फक्त उत्सवाचे ढोंग आहे पीएम केअर्स? असं राहुल गांधी शनिवारी म्हणाले.

रेमडेसिवीरची किंमत कमी झाली, तरीही तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

महत्वाचे लेख