अ‍ॅपशहर

कोटलर पुरस्कारावरून राहुल गांधींची पंतप्रधानांना कोपरखळी

'देशाला उत्कृष्ट नेतृत्व' प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार इतका प्रसिद्ध आहे, की त्यासाठी कोणतेही निवड मंडळ नाही आणि हा पुरस्कार पूर्वी कधी कुणाला मिळालेलाही नाही, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लगावला.

महाराष्ट्र टाइम्स 16 Jan 2019, 3:00 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-gandhi

'देशाला उत्कृष्ट नेतृत्व' प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार इतका प्रसिद्ध आहे, की त्यासाठी कोणतेही निवड मंडळ नाही आणि हा पुरस्कार पूर्वी कधी कुणाला मिळालेलाही नाही, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उत्कृष्ट नेतृत्व प्रदान करताना अथक ऊर्जेने निस्वार्थ सेवा केल्यामुळे भारताने आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानात उत्कृष्ट विकास साधला असल्याचे या पुरस्काराच्या प्रशस्तीपत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार जाहीर होताच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, स्मृती इराणी, राज्यवर्धन राठोड, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि रमण सिंह तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी मोदींचे अभिनंदन केले.

'आमच्या पंतप्रधानांना कोटलर प्रेसिडेन्शियल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. हा पुरस्कार इतका प्रसिद्ध आहे की त्याचे निवड मंडळ नाही आणि यापूर्वी तो कोणाला देण्यातही आलेला नसून अलीगढच्या एका अज्ञात कंपनीचे या पुरस्काराला समर्थन लाभले आहे. पुरस्काराचे इव्हेंट भागीदार : पतंजली आणि रिपब्लिक टीव्ही' असे ट्विट करुन राहुल गांधी यांनी आज या पुरस्कारावरुन पंतप्रधान मोदी यांना कोपरखळी लगावली.

राहुल गांधींच्या उपरोधिक विधानामुळे कोटलर पुरस्कार काय आहे, अशी चर्चा सुरू झाली. हा पुरस्कार यंदाच्या वर्षापासूनच सुरू करण्यात आला असून दरवर्षी राष्ट्रप्रमुखांना देण्यात येईल, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज