अ‍ॅपशहर

राहुल गांधी आज पाटणा न्यायालयात हजर राहणार

'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?' असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आज पाटणा न्यायालयात हजर राहणार आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा खटला भरला होता, त्याची सुनावणी आज होणार असल्याने राहुल यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2019, 11:38 am
नवी दिल्ली: 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?' असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आज पाटणा न्यायालयात हजर राहणार आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा खटला भरला होता, त्याची सुनावणी आज होणार असल्याने राहुल यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-gandhi10


लोकसभा निवडणुकी दरम्यान १३ एप्रिल रोजी कर्नाटक येथील बेलूरच्या ककोरमधील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असं विधान केलं होतं. या वक्तव्याला आक्षेप घेत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात पाटण्याच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. विशेष न्यायिक दंडाधिकारी गुंजन कुमार यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मुझफ्फरपूर येथे चमकी तापाने १४५ पेक्षा जास्त मुलं दगावली होती. त्यामुळे राहुल गांधी मुझफ्फरपूरला जाण्याची शक्यता आहे. मुझफ्फरपूरला जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांची राहुल भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र व्हीव्हीआयपी व्यक्ती आल्याने मृतांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही व्हीव्हीआयपी व्यक्तीला मुझफ्फरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राहुल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज