अ‍ॅपशहर

राहुल गांधी यांचे टि्वटर अकाऊंट हॅक

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अधिकृत टि्वटर अकाऊंट (@OfficeOfRG)हॅक झाले आहे. बुधवारी संध्याकाळी अज्ञात हॅकर्सनी गांधींचे अकाऊंट हॅक केले. त्यानंतर त्यांनी आक्षेपार्ह मेसेज ट्विट केले. राहुल गांधींना टि्वटरवर १२ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Maharashtra Times 30 Nov 2016, 10:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhis twitter handle hacked abusive tweets flow
राहुल गांधी यांचे टि्वटर अकाऊंट हॅक


काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अधिकृत टि्वटर अकाऊंट (@OfficeOfRG)हॅक झाले आहे. बुधवारी संध्याकाळी अज्ञात हॅकर्सनी गांधींचे अकाऊंट हॅक केले. त्यानंतर त्यांनी आक्षेपार्ह मेसेज ट्विट केले.

राहुल गांधींना टि्वटरवर १२ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सनी बुधवारी संध्याकाळी राहुल गांधींच्या टि्वटरवर काही मिनिटांत सुमारे डझनभर आक्षेपार्ह व अपमानास्पद ट्विट पोस्ट केले. लेजिऑन’ नावाच्या एका गटाने हे हँडल हॅक केल्याचे यातील एका ट्विटवरून स्पष्ट करण्यात आले. यातील ट्विट्स नोटाबंदीच्या मुद्द्याशी संबंधित नव्हते; तसेच राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचा अपमान करणारे ट्विट प्रसारित करण्यात आले.

यातील काही ट्विट्स पोस्ट केल्यानंतर काही वेळाने डीलीट करण्यात आले. हॅकरनी राहुल यांच्या हँडलचे ‘बायो’ही बदलले होते. हॅकर्सनी पोस्ट केलेले ट्विट काढून टाकल्यानंतरही नवे आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केले जात असल्याचे दिसून येत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज