अ‍ॅपशहर

राहुल अद्याप अपरिपक्व! : शीला दीक्षित

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अद्याप राजकीयदृष्ट्या परिपक्वता नाहीत. त्यांना अजून वेळ द्यायला हवा, असे मत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.

Maharashtra Times 25 Feb 2017, 4:26 am
टाइम्स वृत्त, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul still immature
राहुल अद्याप अपरिपक्व! : शीला दीक्षित


काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अद्याप राजकीयदृष्ट्या परिपक्वता नाहीत. त्यांना अजून वेळ द्यायला हवा, असे मत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्च सुरू झाल्यानंतर दीक्षित यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करू नये, असे म्हटले आहे.

राहुल अद्याप परिपक्व नाहीत. त्यांचे वय अवघे ४० आहे. या वयात राजकीय परिपक्वता येतेच असे नाही. त्यांना अजून वेळ द्यायला हवा. शेतकऱ्यांविषयी बोलणारे राहुल एकमेव नेता आहेत, असे दीक्षित ‘टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.

राहुल गांधी परिपक्व नाहीत तर त्यांना उत्तर प्रदेशवर का लादले जात आहे. ती राजकीय प्रयोगशाळा किंवा एखाद्यासाठी शिकण्याची जागा आहे का, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यावर विचारला आहे. तर राहुल अपरिपक्व आहेत हे देशवासीयांना माहीत आहेच; परंतु दीक्षित यांनी ते मान्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी म्हटले आहे.

चुकीचा अर्थ नको!

दीक्षित यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असे त्यांनी म्हटले आहे. राहुल अत्यंत संवेदनशील असून, त्यांना परिपक्व नेत्यासारखी जाण आहे. त्यांची भाषा उमदी, धैर्यवान व अविश्रांत माणसासारखी आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज