अ‍ॅपशहर

३० सप्टेंबरपर्यंत गाड्या रद्द? रेल्वे बोर्डाकडून अफवांना विराम

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वेची वाहतूक बंद राहणार असा मेल फिरतो आहे. सोशल मीडियावर हा मेल व्हायरल झाला आहे. या प्रकरणी रेल्वे बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असं बोर्डाने सांगतिलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2020, 7:40 pm
नवी दिल्लीः पूर्व रेल्वेच्या चीफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन मॅनेजरच्या (CPTM)नावे जारी करण्यात आलेल्या तथाकथित मेलमुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या बंद राहतील. यात मेल आणि एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि ईएमयू-डीएमयूचा समावेश आहे, असं या मेलमध्ये म्हटलंय. या मेलमध्ये पूर्व रेल्वेचे सर्व विभाग मुख्यालयांना मार्क केलं गेलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian railway : ३० सप्टेंबरपर्यंत गाड्या रद्द? रेल्वे बोर्डाकडून अफवांना विराम


यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून माहिती घेण्यात आली. पण हा मेल बोगस असल्याचं रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलंय. अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असं रेल्वे बोर्डाने सांगितलं. पुढील आदेशापर्यंत सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असं रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या पत्रात म्हटलंय. यावेळी विशेष गाड्या चालवल्या जातील. रेल्वे बोर्डाने यासंदर्भात २५ जूनला पत्रक काढलं होतं. सर्व नियमित मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी रेल्वे सेवांसह उपनगरी गाड्या १२ ऑगस्टपर्यंत रद्द राहतील, असं त्यात म्हटलं होतं.


व्हायरल होत अससेला बोगस मेल

हिमालयाच्या थंड रात्रीत राफेलची गर्जना; चीन-पाकिस्तान टेन्शनमध्ये

राम मंदिरावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून न्याय झाला नाहीः मुनव्वर राणा

२२ मार्चपासून ऑपरेशन बंद आहेत

कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून प्रवासी गाड्या आणि मेल / एक्स्प्रेस गाड्या बंद करण्यात आल्या. यामुळे देशात प्रथमच रेल्वे सेवा थांबवण्यात आली. देशातील विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी १ मेपासून श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. १२ मेपासून राजधानी मार्गावर काही विशेष गाड्या चालवण्यात आल्या आणि त्यानंतर १ जूनपासून ५० गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज