अ‍ॅपशहर

प्रवासी घटले; रेल्वेला ४०० कोटींचा फटका

भारतीय रेल्वेचे प्रवासी मोठ्या प्रमाणात घटले असून, प्रवासी वाहतुकीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये रेल्वेला ४०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, मालवाहतुकीतील रेल्वेचे उत्पन्न वाढल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची असून, माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2020, 6:08 pm

अमित शहांची यशस्वी मध्यस्थी; बोडोलँड वाद अखेर संपुष्टात

नवी दिल्लीः भारतीय रेल्वेचे प्रवासी मोठ्या प्रमाणात घटले असून, प्रवासी वाहतुकीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये रेल्वेला ४०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, मालवाहतुकीतील रेल्वेचे उत्पन्न वाढल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची असून, माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway


भारतीय रेल्वेला तिकिटे विक्रीतून मिळणारे उत्पन्न घटले आहे. रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न सुमारे ४०० कोटी रुपयांनी घटले आहे. तर दुसरीकडे मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली असून, यामुळे रेल्वेला २,८०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यापूर्वी रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ३,९०१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. या तुलनेने रेल्वेला मालवाहतुकीत झालेला नफा उत्साहवर्धक म्हणावा लागेल. मालवाहतूक वाढावी, यासाठी रेल्वेने खूप प्रयत्न केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.


मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत रेल्वेकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाला उत्तर देताना रेल्वेने माहिती दिली. या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेला १३,३९८.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या तिमाहीत या उत्पन्नात घसरण होऊन ते १३,२४३.८१ कोटी रुपयांवर आले. तर तिसऱ्या तिमाहीत ही घसरण कायम राहून हे उत्पन्न १२,८४४.३७ कोटी रुपयांवर पोहोचले.

AI विकणे देशविरोधी; कोर्टात जाईनः स्वामी

मालवाहतुकीमध्ये पहिल्या तिमाहीत रेल्वेला २९,०६६.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या तिमाहीत या उत्पन्नात घसरण होत ते २५,१६३.१३ कोटी रुपयांवर आले. मात्र, तिसऱ्या तिमाहीत या उत्पन्नात वाढ होऊन ते २८,०३२.८० कोटी रुपयांवर पोहोचले.

निर्भयाः लवकर सुनावणी घ्या; मुकेशची मागणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज