अ‍ॅपशहर

दिल्लीत मे महिन्यात पाऊस! दिवसा पसरला अंधार

दिल्ली एनरसीआरमध्ये अचानक वातावरणात झालेला बदल पाहून नागरिक धास्तावलेत. जिथं काल ४२ डिग्री सेल्सिअस तपमान होतं त्या भागात आज अचानक पाऊस कोसळू लागलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2020, 12:31 pm
नवी दिल्ली : देशात करोना संकट पसरलं असतानाच दिल्लीत अवकाळी पाऊसाला सुरुवात झालीय. करोना व्हायरस लॉकडाऊन सुरू असतानाच दिल्लीत रविवारी अचानक आभाळ भरून आलं... भरदिवसा धुळीनं वातावरण अंधारमय झालं आणि मोठ्या वादळ-वाऱ्यासह दिल्ली - एनसीआरमध्ये पावसाला सुरुवात झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दिल्लीत अवकाळी पाऊस


करोना : देशात २४ तासांत १२७ जणांचा मृत्यू
करोना लस बनवण्यासाठी ICMR-भारत बायोटेकची हातमिळवणी!



राजधानी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात आज पहाटे आभाळ भरून आलेलं दिसलं. ११ वाजल्याच्या दरम्यान वातावरण अंधारलं आणि पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागानं अगोदरच दिल्ली एनसीआरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला होता.



शनिवारी दिल्लीतील काही ठिकाणी पारा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. अचानक तपमान वाढल्यानं नागरिक हैराण झाले होते... पण रविवारी सुरु झालेल्या पावसानं इथल्या नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर टाकलीय.

उल्लेखनीय म्हणजे, करोनानं राजधानी दिल्लीलाही बेजार केलंय. दिल्लीत ६५४२ नागरिक करोनाबाधित आढळलेत तर ७३ जणांचा मृत्यू झालाय.

वंदे मातरम अभियान: २४ तासांमध्ये १,४९८ भारतीयांची 'घरवापसी'
करोना: 'सौम्य' रुग्णांसाठी अधिक मोकळीक; केंद्राची घोषणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज