अ‍ॅपशहर

अनुसूचित जाती-जमातींना आणखी १० वर्षे आरक्षण

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत अनुसूचित जाति-जमातींना आरक्षण देण्याच्या संसदेत मंजूर झालेल्या विधेयकाला राजस्थान विधानसभेने शनिवारी मंजुरी दिली. संसदेत मंजूर झालेल्या या विधेयकाला राज्यांनी मंजुरी देण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार आज, राजस्थान विधानसभेने आज त्याला मंजुरी दिली.

महाराष्ट्र टाइम्स 26 Jan 2020, 7:40 am
जयपूर : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत अनुसूचित जाति-जमातींना आरक्षण देण्याच्या संसदेत मंजूर झालेल्या विधेयकाला राजस्थान विधानसभेने शनिवारी मंजुरी दिली. संसदेत मंजूर झालेल्या या विधेयकाला राज्यांनी मंजुरी देण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार आज, राजस्थान विधानसभेने आज त्याला मंजुरी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reservation


२६ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्याची तरतूद २५ जानेवारी रोजी संपली. तिला १० वर्षे मुदतवाढ देण्याचे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी किमान ५० टक्के विधानसभांनी मान्यता देणे बंधनकारक होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज