अ‍ॅपशहर

एका दिवसात 'कबाली'चा २५० कोटींचा गल्ला

'शंभर कोटी क्लब'च्या गमजा मारणाऱ्या बॉलिवूडवाल्यांच्या तोंडात मारेल अशी कमाल मेगास्टार रजनीकांत यांच्या 'कबाली' सिनेमानं केली आहे. 'सबकुछ रजनीकांत' असलेल्या कबालीनं देशभरात अवघ्या एका दिवसांत अडीचशे कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. एकट्या तामिळनाडूत रजनीच्या कबालीनं १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Maharashtra Times 24 Jul 2016, 10:04 am
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajinikanths kabali smashes all box office records earns rs 250 crore in india on first day
एका दिवसात 'कबाली'चा २५० कोटींचा गल्ला

'शंभर कोटी क्लब'च्या गमजा मारणाऱ्या बॉलिवूडवाल्यांच्या तोंडात मारेल अशी कमाल मेगास्टार रजनीकांत यांच्या 'कबाली' सिनेमानं केली आहे. 'सबकुछ रजनीकांत' असलेल्या कबालीनं देशभरात अवघ्या एका दिवसांत अडीचशे कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. एकट्या तामिळनाडूत रजनीच्या कबालीनं १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

'कबाली'चे निर्माते कलईपुली थानू यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. देशातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रदर्शनाआधीच हाऊसफुल झालेला 'कबाली' काल प्रत्यक्षात चित्रपटरसिकांच्या भेटीला आला. जगभरात आठ ते दहा हजार सिनेमागृहांत 'कबाली' झळकला. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्युझीलंड, श्रीलंका, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, हॉलंड, स्वीडन, दक्षिण अफ्रिका, मलेशिया, नायजेरिया अशा सर्वच देशांना 'कबाली'चा फिव्हर चढला होता. जगभरात 'कबाली'नं अंदाजे १०० कोटींची कमाई केली. तर भारतात २५० कोटींचा टप्पा ओलांडला.

एक वयोवृद्ध गँगस्टार त्याच्या शत्रूंपासून आपल्या कुटुंबाचं व व्यवसायाचं रक्षण कसं करतो, याचं चित्रण 'कबाली'मध्ये आहे. 'एखाद्या चित्रपटानं केवळ एका कलाकाराच्या नावावर जगभरात इतकी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशात रजनीकांत हाच एकमेव सुपरस्टार आहे हेच यातून सिद्ध होते,' असं 'कबाली'चे निर्माते थानू यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज